नाशिक: भरदिवसा घरफोडी; ३ लाख ६५ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३ लाख ६५ हजाराच्या ऐवज चोरुन नेला. राजीवनगर भागात ही घरफोडी झाली. यात सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा मृत्यू

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेश सुर्यकांत मर्गज (रा.श्रेया रेसि.वैभव कॉलनी,सुमन पेट्रोल पंपामागे राजीवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मर्गज कुटुंबिय मंगळवारी (दि.७) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ६४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790