नाशिक: गंगापुर-रोडच्या ‘या’ भागात मोठे झाड कोसळले

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवार सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. शुक्रवारी ही सकाळपासूनच पावसाने शहरात दमदार हजेरी लावली आहे.

शहरातील विविध भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या संततधारेमुळे नाशिकच्या गंगापुर धरणातून ही पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

या दरम्यान, शहरातील गंगापुर रोड भागात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. गंगापुर-रोडच्या विद्या विकास हॉस्पीटललगत असलेले मोठे झाड रस्त्यावर कोसळले आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी दोन्ही बाजूची वाहतुक व्यवस्था यामुळे कोल्मडली आहे. ही घटना समजताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले असून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचे काम सुरु आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790