नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘कोम्बिंग’ऑपरेशन ! ५९ टवाळखोरांवर कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही आठवड्यात अंबड, उपनगर आणि नाशिकरोड परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले होते. त्यामुळे शहर पोलिसांवर मोठी टीकेची झोडही उठली. त्यातच पालकमंत्र्यांनीही आढावा घेत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन अंतर्गत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अचानक राबविलेल्या या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, या कारवाईत ५९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.परिमंडळ दोन अंतर्गत शहर आयुक्तालयातील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. उपनगर, नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

त्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तडीपार करण्यात आलेल्या २६ गुन्हेगारांची तपासणी केली. या गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात येऊन त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. तसेच, ५९ टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आली.

रेकॉर्डवरील सराईत असे ८९ गुन्हेगारांची तपासणी केली असता ५८ गुन्हेगार मिळून आले. तसेच, शरीराविरुद्‌ध गुन्हे असलेले ८८ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: बेकायदा गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा; तब्बल १८० सिलिंडर जप्त, दोघे ताब्यात !

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका  राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सहायक आयुक्त आनंदा वाघ, अंबादास भुसारे, नितीन जाधव, सिद्‌धेश्वर धुमाळ यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्यांसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचार्यांचा ताफा सहभागी होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790