WhatsApp हे असे अॅप आहे जे अनेक फीचर्स प्रदान करते जे वापरकर्त्यांचा अनुभव एकदम भारी आणि सोपा करतात. आतातर एकाच फोनमध्ये अनेक खाती वापरण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. एका खास ट्रीकसह तुम्ही तुमच्या फोनवर २ नव्हे, ३ नव्हे तर थेट 4 वेगवेगळी खाती सहज चालवू शकता. यासाठी तुमच्याकडे Android डिव्हाइस असणे आवश्यक आहे. तसेच 4 नंबर असावेत ज्यामध्ये कॉल आणि मेसेज येतात. चला तर मग जाणून घेऊया एकाच डिव्हाईसमध्ये 4 WhatsApp खाती कशी चालवायची.
खालीलप्रमाणे एकाच डिव्हाइसमध्ये 6 WhatsApp खाती चालवा
- सर्वप्रथम, तुम्हाला दोन व्हॉट्स अॅप डाउनलोड करावे लागतील, एक नियमित अॅप असेल आणि दुसरे बिझीनेस अॅप असेल. ते Google Play Store वरून डाउनलोड करा. या दोन्ही अॅप्समध्ये दोन वेगवेगळे नंबर टाकून सेटअप करा.
- यानंतर तुमच्या फोनमध्ये वर्क प्रोफाइल सेट करा. त्यानंतर प्ले स्टोअरवरून दोन्ही अॅप्स पुन्हा एकदा डाउनलोड करा. येथे दोन नंबर वापरून दोन व्हॉट्सअॅप खाती देखील सेट करा.
- यानंतर, उर्वरित दोन खात्यांसाठी, तुम्हाला फोनचे ड्युअल अॅप फीचर वापरावे लागेल. जवळजवळ प्रत्येक कंपनी ही सुविधा देते. यामदतीने तुम्ही आणखी दोन खाती चालू करु शकता.
तर कोणत्या कंपनीत कशी ही सुविधा वापराल ते जाणून घेऊ…
Realme- सेटिंग्ज वर जा. अॅप क्लोनर शोधा आणि नंतर WhatsApp निवडा.
Oppo- सेटिंग्ज वर जा. अॅप मॅनेजमेंटमध्ये अॅप क्लोन वर जा. त्यानंतर व्हॉट्सअॅप निवडा आणि ते चालू करा.
Samsung- सेटिंग्ज वर जा. त्यानंतर Advanced Features वर जा. यानंतर ड्युअल मेसेंजरवर जा आणि व्हॉट्सअॅपवर टॉगल करा.
OnePlus- सेटिंग्ज वर जा. नंतर Utility वर जा आणि Parallel Apps वर जा. त्यानंतर व्हॉट्सअॅपचे टॉगल चालू करा.
Xiaomi/Redmi/Poco– सेटिंग्ज वर जा. त्यानंतर सर्चमध्ये जाऊन ड्युअल अॅप्सवर जा. त्यानंतर व्हॉट्सअॅप निवडा आणि टॉगल करा.
Vivo/iQoo – होम स्क्रीनवर WhatsApp वर जा. नंतर लाँग प्रेस करा. त्यानंतर + आयकॉनवर टॅप करा. तिथून तुम्ही क्लोन अॅप सुरु करु शकता.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790