नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ११९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६९, चांदवड ०७, सिन्नर ५९, देवळा २, दिंडोरी २२, निफाड ५९, नांदगांव १६,येवला ४१, त्र्यंबकेश्वर १२, कळवण ०१ ,बागलाण १५, इगतपुरी २७, मालेगांव ग्रामीण २० असे एकूण ३५० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, पेठ, या दोन तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३९ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५८ तर जिल्ह्याबाहेरील ३९ असे एकूण १ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ९३० रुग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यंतचे मृत्यू :
नाशिक ग्रामीण ४२ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७३ व जिल्हा बाहेरील ११ अशा एकूण २२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
- ३ हजार ९३० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार ११९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
- सध्या जिल्ह्यात १ हजार ५८६ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
वरील आकडेवारी सोमवार (दि. २९ जून २०२०) सकाळी १०.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.