नाशिकमध्ये भरवस्तीत शिरला बिबट्या, हल्ल्यात पादचारी जखमी; Video

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक रोड येथे आनंद नगरमधील गुलमोहर कॉलनीत रविवारी रात्री भरवस्तीत बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने रात्रीच्या वेळी या परिसरातील नागरिकांनी बाहेर निघू नये असे आवाहन केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण गुन्हे शाखेच्या ताब्यात !

रात्री आठच्या सुमारास आनंदनगर गुलमोहर कॉलनी येथे बिबट्या दिसला. भरवस्तीत बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर निवासी भागातील रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुलमोहर कॉलनीतील डॉक्टर कनौजीया यांच्या बंगल्यात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसंच कदम लॉन्ससमोरील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी अवघ्या काही फुटांवर बिबट्या समोर उभा ठाकल्याने पादचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

बिबट्याने कदम लॉन्सजवळ एका पादचाऱ्यावरही हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. जखमी पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790