नाशिक: दुचाकीवरून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यु

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले बिटमार्शलचा दुचाकीवरून पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

बिटमार्शल पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे (४१, जुना सायखेडा रोड, नाशिकरोड) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  संत श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा: भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

वाटाणे हे गेल्या शनिवारी (ता. ८) सायंकाळी पिन्टो कॉलनीतून नारायण बापू नगरकडे दुचाकीवरून उपनगर पोलिस ठाण्यात जात होते. त्यावेळी ते धावत्या दुचाकीवरून अचानक पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते.

त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘एनसीएफ’तर्फे नाशिककरांचा अपेक्षानामा सादर

त्यांच्या मागे आई-वडील, बहिण, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790