नाशिक: चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेले; घटना सीसीटीव्ही मध्ये घटना कैद CCTV

नाशिक (प्रतिनिधी): भरदिवसा खून, विचित्र आत्महत्या, हाणामारीने नाशिकरोड गाजत असतांना आज पहाटे सामनगाव,चाडेगाव रोड वरील रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ असलेल्या एटीएम मशीन चोरट्यानी चोरून नेले.

सामनगाव, चाडेगाव या भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्र असून तिथे भारतातून अधिकारी, कर्मचारी जवान प्रशिक्षण घेण्यासाठी येत असता. हा भाग ग्रामीण परिसरात येत असल्याने पैसे काढणे करीता रेल्वे सुरक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी जवान यांना खूप त्रास होत असे.

हे ही वाचा:  नाशिकरोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या; सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास

प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी यांनी या ठिकाणी एटीएम बसवण्यासाठी चाडेगाव ग्रामस्थ यांना विनंती केल्यानंतर जागा उपलब्ध करून दिली. व या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम मशीन बसवण्यात आले.

आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चार चोरट्यानी पिकप वाहनातून येऊन एटीएम मशीन कट करून गाडीत टाकून चोरून नेले. भल्या पहाटे झालेल्या प्रकारा मुळे परिसरात घबराट पसरली आहे.हा चोरी चा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन तपास करीत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: जॉबचे आमिष दाखवून ११ युवकांना ६५ लाखांचा ऑनलाईन गंडा

सामनगाव, चाडेगाव परिसर हा ग्रामीण भाग असलेला परिसर आहे. सध्या पावसाळा असल्याने नागरिक रात्री लवकर झोपतात.  या भागात अनेक वेळा चोऱ्या, दरोडा असे प्रकार घडले असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी. शस्रधारी पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा पदाधिकारी राजेश जाधव व गावकऱ्यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group