Amazon

नाशिक: 3 कोटी 85 लाखांच्या मशिनरीसह साहित्याची चोरी सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश करून सिक्युरिटी गार्ड व महिला कामगारांना मारहाण करून सात जणांच्या टोळीने 3 कोटी 85 लाख 25 हजार रुपये किमतीची मशिनरी व इतर साहित्य चोरून नेत महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार सातपूर एम. आय. डी. सी. मधील एका कंपनीने केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे (वय 42, रा. वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) यांची सातपूर एम. आय. डी. सी. मधील प्लॉट नंबर 109/3 येथे हर्षिता इलेक्ट्रिकल्स व एबीबी नावाची कंपनी आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

या कंपनीत दि. 15 जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित केशरसिंग शेखावत (वय 30), रोहित राजेश गोरण (वय 28), रितेश राकेश बुरट (वय 25), पंकज मदनलाल लोट (वय 32), सूरज शंभूजी टाक (वय 32), दिग्विजय गोवर्धन सिंग (वय 38) व अजय इंदरलाल लोट (वय 36, सर्वांचे पत्ते माहीत नाहीत) यांनी कंपनीत प्रवेश करून तेथील सिक्युरिटी गार्डचे मोबाईल बळजबरीने काढून घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

तसेच कंपनीतील मशिनरीची तोडफोड केली. त्यानंतर 3 कोटी 85 लाख 25 हजार रुपये किमतीची मशिनरी व इतर साहित्य फिर्यादी गिरासे यांच्या संमतीशिवाय चोरून नेले, तसेच महिला कामगारांना मारहाण करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. वरील अर्थाची फिर्याद गिरासे यांनी दिल्यावरुन सातपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790