मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार !

मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार

2000 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार आहे. आरबीआयने याबाबत निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटांची वैधता असणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बेकायदा गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा; तब्बल १८० सिलिंडर जप्त, दोघे ताब्यात !

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: शतपावली करतांना पाय घसरून नाल्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू...

नोटा कधीपासून बदलता येणार?:
आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790