🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: कुत्रा आडवा आल्याने दुचाकीला अपघात, पपया नर्सरी येथे तरुण ठार

नाशिक: कुत्रा आडवा आल्याने दुचाकीला अपघात, पपया नर्सरी येथे तरुण ठार

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात भरधाव दुचाकीस कुत्रा आडवा गेल्याने झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरूण ठार झाला. गणेश रघूनाथ बागुल (२१ रा. लखानी ता. कळवण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोडी प्रकरणी आरोपी अटक; साडेचार लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

बागुल गुरूवारी (दि.११) सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने पपया नर्सरी कडून सातपूर कॉलनीच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

भरधाव दुचाकीस कुत्रा आडवा आल्याने तो पडला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मित्र शरद गायकवाड यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790