घुशीमुळे वृद्ध महिलेचा मृत्यू; नाशिक शहरातील धक्कादायक घटना

नाशिक (प्रतिनिधी): घुशीमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरात घडली आहे. ही महिला गंजमाळ परिसराची रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, हा प्रकार कसा काय घडला याबाबतही जोरदार चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंजमाळ भागात अत्यंत दाट वस्ती आहे. बबाबाई गायखे (वय ९० वर्षे) ही वृद्ध महिला गंजमाळ मधील श्रमिकनगर झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून राहते. या महिलेला दोन मुले आहेत. मात्र, ते तिच्यासोबत राहत नाहीत. सध्या या महिलेसोबत नातू राजू आणि राहुल एखंडे हे राहत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा: आपत्ती निवारणार्थ 264 कोटी रुपयांचे प्रस्ताव पात्र

रात्री झोपेत असताना बबाबाई यांच्या हातासह पंजाला घुशीने कुरतडले. त्यामुळे त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. त्यांनी रात्रीच दवाखान्यात दाखल होणे आवश्यक होते. मात्र, त्यांना दाखल करण्यात आले नाही. अखेर ही बाब सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांना कळाली. त्यांनी तातडीने बबाबाई यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील १ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पुण्यातून अटक !

दरम्यान नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गंजमाळ परिसरात गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र मूलभूत काम पूर्ण झाल्यानंतर गटारीच्या कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या भागात उंदीर घुशींचे प्रमाण वाढले आहे. संबंधित ठेकेदारास ते काम करण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र करू करू म्हणत अद्यापही काम जैसे थे आहे. त्यामुळे बबाबाईच्या मृत्युप्रकरणी मनपाचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके म्हणाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here