नाशिक: पोलिसांना मारहाण करणाऱ्या चौघांना 7 वर्षे कारावास!

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील आयशानगर भागातील फिरस्तीशहा बाबा दर्ग्याजवळ पोलिस हवालदार शंकर पवार व पोलिस शिपाई विशाल बावा या दोघांना जबर मारहाण, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन चौघा सराईत गुन्हेगारांना सात वर्षे सश्रम कारावास व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. डी. कुरुलकर यांनी हा निकाल दिला. या खटल्याची माहिती अशी : आझादनगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात संशयित फिरस्तीशहा बाबा दर्ग्याजवळील बांधकामाजवळ लपून बसल्याची माहिती शंकर पवार व विशाल बावा यांना मिळाली होती.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

नाशिक: कोष्टी हल्ल्यातील संशयितांच्या कोठडीत वाढ

त्यानुसार ३० एप्रिल २०१०ला संशयितांना पकडण्यासाठी दोघे त्याठिकाणी गेले होते. तेथे श्री. बावा यांनी अकील सय्यद लाल उर्फ अकिल चिंग्या याला पकडले. त्याचवेळी अकिल चिंग्याने धारदार वस्तऱ्याने त्यांच्या डाव्या हातावर, तोंडावर व पाठीवर जबर वार करुन जिवे ठार मारण्याचा दम दिला.

हवालदार श्री. पवार यांनी श्री. बावा यांना फरहान हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेऊन जात असताना अकीलसह शफीक सय्यद लाल, शकील सय्यद लाल, माजीद अलाउद्दीन सय्यद (चौघे रा. मदनीनगर) या चौघांनी दगडफेक करुन पवार यांनाही जखमी केले.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

तसेच, शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याचा दम दिला. याही स्थितीत पवार यांनी बावा यांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर श्री. पवार यांच्या तक्रारीवरुन संशयितांविरुद्ध आयशानगर पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आयशानगर पोलिसांनी संशयितांना अटक केली. सहाय्यक निरीक्षक कन्हैय्यालाल बेनवाल यांनी तपास करुन खटला न्यायालयात पाठविला. न्या. कुरुलकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय सोनवणे यांनी सहा साक्षीदार तपासले. न्यायालयात संशयीतांवरील आरोप व गुन्हा सिद्ध झाल्याने चौघांनाही वेगवेगळ्या कलमान्वये सात वर्षे कारावास व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ॲड. सोनवणे यांना अतिरिक्त सरकारी वकील ए. एन. पगारे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सुमित पाटील यांनी सहकार्य केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790