नांदूर शिंगोटे परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नांदूर शिंगोटे परिसरामध्ये सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. चार वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदानाची लगबग संपल्यानंतर अचानकपणे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तुफान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

येथील आठवडे बाजारला पावसाने झोडपले. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या परिसरातील लोकांची धांदल उडाली. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर कांदा पोळी ठेवलेल्या आहे. त्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये चार दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, जळगावला उष्णतेची लाट...

मात्र अचानकपणे पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वच कांदा पोळी झाकल्या गेल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परत नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group