नाशिक: अंगावर उकळते तेल सांडून भाजल्याने वडापाव विक्रेत्या महिलेचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरीरोडवर भाजीबाजार परिसरात वडापाव विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडापाव तळत असताना उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील रगम तेल अंगावर सांडले.
यात ही महिला गंभीर भाजली. आणि अखेर या व्यावसायिक महिलेचा मृत्यू झाला आहे. शुभदा अशोक लोखंडे (४६ रा. सप्ततारा रो हाऊस बोरगड, म्हसरूळ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडे यांचा म्हसरूळ गावातील भाजी मार्केट परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. २३ फेब्रुवारी रोजी त्या आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली होती. वडपाव तळत असतांना गॅसवर ठेवलेल्या उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील तेल त्यांच्या अंगावर सांडले.
या घटनेत त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तातडीने सिनर्जी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना मुंबईतील केईएम रूग्णालयात हलविण्यात आले होते. महिना भराच्या उपचारादरम्यान २८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790