नाशिक: “तू मुलीला फोन का करतो” म्हणत युवकास बेदम मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): मुलीला फोन का करतोस, असे म्हणून एका युवकास लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल व मोटारसायकलीचे नुकसान केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी गणपत रामभाऊ जाधव (रा. हिसवाळ, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांचा मुलगा नितीन गणपत जाधव याला संशयित आरोपी नीलेश ठोके, प्रसाद शिरीष मुळे व अनोळखी इसम यांनी संगनमत करून त्रिमूर्ती चौकातील गॅलॅक्सी हॉस्पिटलजवळ रस्त्यात गाठले.
“तू मुलीला फोन का करतोस?” असे विचारत त्याला लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली, तसेच त्याच्याजवळील मोबाईल व मोटारसायकलीचे नुकसान केले. हा प्रकार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडला होता.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.