नाशिकमध्ये रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; एक जखमी, पंचवटीत गुन्हा दाखल !

नाशिकमध्ये रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; एक जखमी, पंचवटीत गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): नंबरच्या वादातून दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

या घटनेत लोखंडी फायटरचा वापर करण्यात आल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पेठफाटा परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : तीन लाखांचे दोन लॅपटॉप असलेली बॅग अवघ्या दोन तासांत परत; सरकारवाडा पोलिसांची तत्परता आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

सागर अशोक मुळे (२७) असे मारहाण करणाऱ्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश कैलास जाधव (रा.विजय चौक,फुलेनगर) या रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली आहे. जाधव याने बुधवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास पेठ फाटा परिसरातील उत्तम हिरा हॉटेल भागातील रिक्षा थांब्यावर आपली अ‍ॅटोरिक्षा प्रवाशी भरण्यासाठी नंबरवर पार्क केली असता ही घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत ऑटोरिक्षासाठी सुधारित भाडेदर लागू; जाणून घ्या सविस्तर…

संशयिताने आपला नंबर असल्याची बतावणी करीत जाधव यांना शिवीगाळ केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दीक चकमक होवून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत मुळे याने जाधव यास लोखंडी फायटर मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790