नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात गुरुवारी (दि. १८ जून २०२०) रात्री उशिरा नव्याने अजून ६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या आधी सायंकाळी ३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता एकूण कोरोना रुग्ण:-९७८ एकूण मृत्यू:- ४८(आजचे मृत्यू-२) घरी सोडलेले रुग्ण :- ४०४ उपचार घेत असलेले रुग्ण:- ५२५ अशी झाली आहे.
त्यामुळे आता दिवसभरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११७ झाली आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि. १८ जून) रात्री १० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पेठरोड (दत्त नगर)-१, पेठ रोड (राम नगर)-७, उत्तम नगर-१, पंचवटी-१, पेठ रोड (विशाल नगर)-१, फुले नगर (भरड वाडी)-३, विद्या नगर (पौर्णिमा स्टॉप)-१, कथडा (जुने नाशिक)-१, फुले नगर-१, नाशिक इतर-१ अशा एकूण १८ रुग्णांचा समावेश आहे.
गुरुवारी रात्री ९.३५ वाजता आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पेठ रोड-१२, अमरधाम रोड (कथडा)-१, कोकणीपुरा-१, पखालरोड-१, हरी मंजिल-१, औदुंबर स्टॉप (सिडको)-२, दिपाली नगर-१, वडाळा रोड-२, कामठवाडा-१, अंबड लिंक रोड-२, उपनगर-१, इंदिरानगर—१, राजीव नगर (पंचवटी)-१, पवारवाडी (नाशिकरोड)-१, विहितगाव-१, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, शिंगवे बहुला (देवळाली)-१, शिवाजी नगर (सातपूर)-१, राम नगर (पंचवटी)-४, बोधले नगर-२, म्हाडा कॉलनी-५, दत्त नगर (पेठरोड)-२, भारत नगर-१, मेरी कॉलनी-१, शांती नगर-१, गजानन अपार्टमेंट (टवाळी फाटा)-१, कला नगर (म्हसरूळ)-३, खाद्काळी-८, बाजीप्रभू चौक (सिडको)-१, पेठ रोड (दत्त नगर)-२ अशा एकूण ६३ रुग्णांचा समावेश आहे.
या आधी गुरुवारी (दि. १८ जून) सायंकाळी ७.३० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: कोकणीपुरा-१, वृंदावन कॉलनी-१, फुले नगर-१, पखाल रोड-१, पेठ रोड (पंचवटी)-१, कथडा-१, सावरकर नगर-१, टिळकवाडी (आरटीओ)-१, पेठ रोड-१, उंटवाडी-१, चौक मंडई-१, राका कॉलनी-१, मखमलाबाद-१, ओम नगर-४, गंजमाळ-२, दत्त नगर-९, पेठ फाटा-१, जुने नाशिक-३, शालीमार-१, रत्नदीप हौसिंग (पंजाब कॉलनी)-१, संभाजी चौक-१, उत्तम नगर-१ अशा एकूण ३६ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती: श्रमिक नगर गंजमाळ येथील ६० वर्षीय महिला दिनांक १६ जून २०२० रोजी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाली होती.त्यांचे दिनांक १७ जून २०२० रोजी उपचार सुरू असताना निधन झाले आहे.
गणेश वाडी नाशिक पंचवटी येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती दिनांक १६ जून २०२० रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती.त्यांचे दिनांक १७ जून २०२० रोजी उपचार सुरू असताना निधन झाले आहे.