नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: लोखंडी ॲंगल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक; दुचाकीस्वार ठार
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जकात नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला लोखंडी ॲंगलची वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पो थांबलेला असता, त्यावर भरधाव वेगातील दुचाकी येऊन धडकली.
यात सिडकोतील पशुवैदयक दुचाकीस्वाराच्या पोटात लोखंडी ॲंगल घुसल्याने ते जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरील घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी पाच-साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली.
दीपक धर्मा आहेर (४१, रा. महेश मेडीकल समोर, गणेश चौक, सिडको) असे मृत पशुवैद्यकाचे नाव आहे. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराचा मिनी टेम्पो (एमएच ०९ सीए ८०३५) विल्होळी येथील जकात नाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. टेम्पोतून लोखंडी ॲंगलची वाहतूक केली जात असतानाच, टेम्पोचालक हा टेम्पोतील लोखंडी अँगल घसरत असल्याने ते तो पॅक करीत होता.
तर, पशुवैद्यक आहेर हे सोमवारी (ता.२७) सायंकाळी पाच वाजता पॅशन प्रो दुचाकीवरुन (एमएच १५ सीवाय ०१२८) नाशिककडून वाडीवऱ्हेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आहेर यांच्या दुचाकीला पाठीमागील दुसऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते टेम्पोवर पाठीमागून जाऊन आदळले.
नाशिक: अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई
या दुर्दैवी घटनेत टेम्पोतून बाहेर आलेले लोखंडी अँगल त्यांच्या पोटात शिरल्याने अतिरक्तस्त्राव होऊन ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना गौळाणे येथील शंकर तपासे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत दीपक व त्यांच्या कुटुंबाचे घटनेच्या काही तासांपूर्वीच फोनवर बोलणे झाले होते. दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयात धाव घेत हंबरडा फोडला. या घटनेमुळे सिडकोतील गणेश चौक परिसरात शोककळा पसरली.
![]()


