Breaking: नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात; बस दुचाकीला धड़कली: दोन जण ठार

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Breaking: नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात; बस दुचाकीला धड़कली: दोन जण ठार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक परिसरात पुन्हा एक भीषण अपघात  झाला असून खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. आज (दि. ११ मार्च) सकाळी ही घटना घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

देवदर्शनाहून परतताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, खासगी वाहतूक करणारी बस (MH 47 AS 4848) प्रवाशांनी भरलेली होती. त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून निघाल्यानंतर नाशिककडे मार्गक्रमण करीत होती. अशातच बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुल जवळ आली असता टायर फुटले. बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली. यामुळे नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक देत झाडावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दुचाकीवरील जखमींना तातडीने जवळच्या दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790