नाशिक: प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनीच्या एरिया मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनीच्या एरिया मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): स्टार हेल्थ एंड अलाइड इन्शुरन्स कंपनीतील एरिया मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला सहका-याच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करून कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ही घटना पोलिस स्थानकात पोहचली आहे.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक सिलिंडर झाले 'इतक्या' रुपयांनी स्वस्त...

पीडितेच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचा एरिया मॅनेजर निलेश अनिल कदम असे संशयिताचे नाव आहे.

या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे कालिका मंदिरासमोर कार्यालय आहे. येथे मार्च २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीवरुन समोर आले. या काळात संशयिताने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार संबध प्रस्थापित केले व मारहाणही केली तसेच तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोक्सो प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी; पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

या सर्व प्रकाराला कंटाळून पीडिता ७ फेब्रुवारी २०२३ ला राजीनामा देण्यासाठी कंपनीत गेली असता संशयिताने पीडिता ही शारिरीक संबंधसाठी पैशाची मागणी करते अशी बदनामीकारक अफवा ऑफिसमध्ये पसरवली. त्यानंतर पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. याबाबत संशयित निलेश अनिल कदम याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0048/2023) याप्रकरणी सहायक निरीक्षक साजीद मन्सूरी तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790