नाशिक: कॉलेजरोडला क्रिकेट खेळताना युवकाचा हृदयविकाराच्या झटकाने मृत्यु
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला कॉलेजरोड परिसरात क्रिकेट खेळताना एका युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे…
कॉलेज रोड परिसरात क्रिकेट खेळताना ३२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. आकाश रवींद्र वाटेकर (३२, रा. राणेनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा मंगळवारी (ता. २४) सायंकाळी एनबीटी विधी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यास अस्वस्थ वाटले. त्यामुळे त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी आकाशला तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
![]()


