Amazon

नाशिक: दारूचे पैसे मागितले म्हणून बारचालकासह तिघांना कोयत्याने मारहाण…

Ad: तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करा नाशिक कॉलिंगवर…

नाशिक (प्रतिनिधी): औरंगाबाद रोड वरील सारंगबार येथे दारू घेण्यासाठी आलेल्यांकडे घेतलल्या दारूचे पैसे मागितल्याच्या कारणावरून बार मॅनेजर सह तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याबाबत तिघांविरुध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मितेश मनीलाल राठोड, (वय 24, रा. 4 श्रीहरी पार्क, अमृतधाम, पंचवट) यांनी फिर्याद दिली आहे की,सारंगबार, औरंगाबाद नाका येथे दि.18 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आकाश नरोडे (वय 24, रा. नाशिक),विकी नरोडे (वय 25, रा. नाशिक), रवी गांगुर्डे (वय 25, रा. नाशिक) अक्षय बेजेकर( वय 26, रा. नाशिक).  दिपक बेजेकर, (वय 26, रा. नाशिक) व  इतर 3 साथीदार यांनी हे बारमध्ये आले.

🔎 हे वाचलं का?:  दिवाळीतच नाशिकमध्ये थंडीची चाहूल; किमान तापमान १४.३ अंशांवर

त्यांनी यावेळी  मधून दारू घेतली. घेतलेल्या दारूचे पैसे मागितले असता कसले पैसे असे म्हणून दारूचे पैसे न देता  त्यांनी बारमध्य हाणामारी करण्यास सुरवात केली.

🔎 हे वाचलं का?:  अन्न भेसळखोरांना FDA चा दणका! नाशिक विभागात १२० आस्थापनांचे परवाने निलंबित; ३.७८ कोटींचा साठा जप्त

यात मितेश मनीलाल राठोड (वय 24, रा. 4 श्रीहरी पार्क, अमृतधाम, पंचवटी), अजय सुरेश पाटील (वय 28, रा. 3673, सावरकर चौक, जुने नाशिक) राजेंद्र विठोबा काकवीपुरे (वय 25, रा. जत्रा हॉटेल मागे, आडगाव शिवार) या  तिघांना लोखंडी कोयत्याने मारहाण केली आहे. या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत !

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790