नाशिकच्या लेकीची उत्तुंग भरारी! 14 व्या वर्षीच मिळवली दोन विद्यापीठाची डॉक्टरेट
अवघ्या 14 वर्षाच्या कन्येने कोलंबिया आणि घाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्राप्त केली आहे. गीत पराग पटणी असे या चिमुकलीचे नाव असून गीतने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी वेगवेगळ्या सात विद्यापीठांना तिचे संशोधन प्रबंध सादर केले होते.
त्यापैकी कोलंबिया आणि घाना या विद्यापीठाची डॉक्टर पदवी मिळून तिने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.
एवढ्या कमी वयात एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे डॉक्टरेट मिळवणारी गीत देशात पहिलीच मुलगी ठरल्याचा दावा वरील डॉक्टर पराग पटणी यांनी केला आहे.
मागील दोन वर्ष देशासह जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला. नाशिकमध्ये देखील दोन वर्ष भयावह परिस्थितीला सर्वांनीच तोंड दिले.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11650,11652,11654″]
या दोन वर्षांच्या कालखंडात अनेकांचे रोजगार गेले, अनेकांनी नवे व्यवसाय उभारले. काहींनी वेगवगेळ्या कामात स्वतःला गुंतवून घेतले. नाशिकच्या गीतने अशाच एका विषयाला वाचा फोडत संशोधनाच्या माध्यमातून जगासमोर मांडले. या काळात जेष्ठांसह लहान मुलं मुली घरीच असल्याने मोबाईलची सवय लागल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील गीतने मुलांच्या वाढत्या मोबाईल सवयीमुळे कसे दुष्परिणाम झाले? त्यावर योग्य अभ्यासातून कसे उपाय करता येतील यावर शोध निबंध लिहले.
- Ad: नाशिक शहरात या ठिकाणी मिळतंय अस्सल काळ्या मसाल्याचे मटण भाकरी…!
- Ad: Admission Open For 11th, 12th Biology And Biology NEET 2023-24 Batch
अवघ्या चौदा वर्षांच्या असलेल्या गीतने हे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील सात विद्यापिठांना सादर केले. यातील दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून गीतला या शोधनिबंधासाठी डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोलंबिया आणि घाणा या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट एकदाच मिळवणारी गीत देशातील कमी वयात हा बहुमान मिळविणारी ती देशातील पहिली मुलगी असल्याचा दावा गीतचे वडील पराग पटणी यांनी केला आहे. कारण एकाच वेळी दोन डॉक्टरेट इतक्या कमी वयात कोणालाही मिळालेल्या नाहीत.
नाशिक शहरातील नामांकित निर्मला कॉन्व्हेन्ट शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या गीतला लहानपणापासून योगाची खूप आवड आहे. गीतची आईवडील हे डॉक्टर असल्याने लहानपणापासून योगाची आवड निर्माण झाली. त्यातूनच तिने पुढे योगाचे क्लास देखील घेण्यास सुरवात केली. दरम्यान कोरोना काळात योगाचे क्लास सुरु असताना तिच्या अस लक्षात आले की सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत.
त्यामुळे मुल मोबाईल आणि इतर गॅझेटसचा अधिक वापर करत आहेत आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर मानसिकतेवर देखील परिणाम होत आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी गीतने ‘ कोरोना काळात लहान मुलांकडून मोबाईलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय’ विषयावर प्रबंध तयार करून जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना सादर केला होता आणि त्यातून कोलंबिया आणि घाणा या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी गीतला डॉक्टरेट दिली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790