नाशिक (प्रतिनिधी): शहरात रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे आज एकूण दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकूण कोरोना रुग्ण-३७८, एकूण मृत्यू- २०, घरी सोडलेले रुग्ण-१४८, उपचार घेत असलेले रुग्ण – २१० अशी संख्या झाली आहे. अशातच रविवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी सुद्धा दिसून आली.
रविवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांची माहिती पुढीलप्रमाणे:
फुले मार्केट कोकणीपूरा येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
त्रंबक दरवाजा,दूध बाजार, नाशिक येथील २७ वर्षीय युवती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
खतीब बंगलो दारुसलाम कॉलनी येथील २७ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याच कुटुंबातील २५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल आलेला आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
चक्रधर सोसायटी टाकळी रोड नाशिक येथील ३४ वर्षीय व्यक्ती, ८ वर्षीय मुलगी,५६ वर्षीय व २९ वर्षीय महिला हे सर्व एकाच कुटुंबातील असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हे जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
७, उत्कर्ष कॉलनी भाभा नगर, मुंबई नाका येथील २२ वर्षीय हा युवक ३१ मे २०२० रोजी अमेरिकेहून आलेला होता त्यास एका हॉटेल मध्ये कोरनटाईन करणेत येऊन त्याचे स्वाब घेण्यात आले होते त्याचा अहवाल आज आला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
जयश्री निवास, गोविंद नगर नाशिक येथील ३९वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
पंचकृष्णा बंगलो, काठे मळा,टाकळी रोड येथील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती:
पाटील पार्क,अंबड लिंक रोड येथील ४९ वर्षीय व्यक्तीला सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने दिनांक २६ मे २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाली होती त्याच्यावर उपचार सुरू असताना आज रविवार दि. ७ जून २०२० रोजी सकाळी ८ च्या सुमारास त्यांचे निधन झालेले आहे. हा रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरातील होता.
बालाजी सदन,नागचौक,पंचवटी येथील ८५ वर्षाची महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता त्या महिलेवर उपचार सुरू असताना आज रविवार दि. ७ जून २०२० रोजी रात्री १२.३० च्या सुमारास निधन झालेले आहे.