Amazon

नाशिक: पत्नीसह सासरच्या मंडळीच्या छळास कंटाळून युवकाची आत्महत्या

नाशिक: पत्नीसह सासरच्या मंडळीच्या छळास कंटाळून युवकाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीसह सासरच्या मंडळीच्या छळास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पैश्यांसाठी वारंवार धमकावण्यात येत असल्याने मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पत्नीसह सासरच्या मंडळीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुजा तिलककुमार छेत्री, पुजाचा बॉय फ्रेंण्ड दिप व त्याची पत्नी आणि सविता छेत्री (रा.सिलीगुडी,पं.बंगाल) अशी संशयितांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

याप्रकरणी सुनिता चंद्रकांत नागरे (५० रा. जत्रा हॉटेल मागे,स्वामी समर्थ नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सुनिता नागरे यांचा मुलगा योगेश चंद्रकांत नागरे यांनी ३० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. नांदूरनाका लिंकरोडवरील शेवंता लॉन्स भागात तो विषारी औषध सेवन केलेल्या अवस्थेत मिळून आला. पत्नी व सासरच्या मंडळीकडून पैश्यांसाठी त्यास धमकविले जात होते. सासरच्या मंडळीच्या सततच्या छळास कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आई नागरे यांनी केला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790