Amazon

महत्वाची बातमी: नाशिककरांनो आजपासून रिक्षा प्रवास महागणार

महत्वाची बातमी: नाशिककरांनो आजपासून रिक्षा प्रवास महागणार

नाशिक (प्रतिनिधी): सर्वसामान्य वर्ग महागाईच्या खाईत लोटला जात असतानाच पेट्रोल दरवाढीचा फटका आता प्रवाशांना बसणार आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

त्यानुसार १ ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच दीड किलोमीटरला (१.५) आता २७ रुपये व त्यापुढील किलोमीटरसाठी १८ रुपये मोजावे लागणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

दरम्यान, ऑटो रिक्षा परवानाधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत भाडे मीटरमध्ये बदल करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.

नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या ऑटो रिक्षांचे दर हे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नाशिकमार्फत निश्चित केले जातात. प्राधिकरणामार्फत ऑटोरिक्षाचे सध्याचे दर ९ जानेवारी २०१५ रोजी लागू करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

परंतु मागील गतवर्षाच्या तुलनेत पेट्रोल इंधनाच्या दरात वाढ झालेली असून पेट्रोल इंधनाचे दर प्रति लिटर रुपये १०६. ७२ झालेले आहे. खटुआ समितीच्या शिफारशींच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधनाचे दर इतर संबंधित बाबी विचारात घेऊन त्याचप्रमाणे रिक्षाचालक/ मालक व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने गुरुवारी (ता. २९) झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारीत केलेला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

या ठरावानुसार १ ऑक्टोबरपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. त्यामुळे रिक्षा परवानाधारकांनी भाडे मीटरचे रि-कॅलिब्रेशन बदल ) १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत करून घेणे आवश्यक आहे. भाडे मीटरचे री-कॅलिब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टॅरिफ कार्ड ३० नोव्हेंबरपर्यंतच अनुज्ञेय राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790