नाशिक: मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 गंभीर

नाशिक: मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 गंभीर

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी शहरातील मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातुन किंवा पाण्यातुन विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज बुधवार ( ता.२४ रोजी ) पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाली असुन यात उलटया होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

तर दोन विद्यार्थी अत्यावस्थ असुन त्यांना नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

तसेच चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कारण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यार्थ्यानाठी विद्यालय चालवणाऱ्या संस्था आहे.

या विद्यालयात १२० विद्यार्थी असुन मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील ८ विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरु झाला.

यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले असुन चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

काल पहाटे पासून विद्यार्थ्यांना त्रास सुरू होता. या घटनेत हर्षल गणेश भोईर, वय २३, रा. भिवंडी, जि. ठाणे व मोहम्मद जुबेर शेख, ११ रा. नाशिक या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तर प्रथमेश निलेश बुवा, वय १७ व देवेंद्र कुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला पाठवण्यात आले आहे.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

तर उर्वरित मुलांची तपासणी सुरू केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी खालेल्या अन्नाचे सँपल केले जमा केले असुन या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी साठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790