हृदयदावक: चहा करण्यासाठी गॅस पेटवला अन् भीषण स्फोट झाला, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

हृदयदावक: चहा करण्यासाठी गॅस पेटवला अन् भीषण स्फोट झाला, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर येथील मुसळगाव वसातहीतीमधील उज्ज्वलनगर परिसरात घडली.

या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या स्फोटात दीपराज देवराज साकेत (१९) आणि कृष्णचंद्रा देवराज साकेत (२७), या दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे.

हे दोन्ही भाऊ मुळ राहणारे मध्यप्रदेशचे आहे. सध्या ते मुसळगाव येथे राहत होते. काही दिवसांपासून मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील  एका कारखान्यात ते नोकरी करीत होते.

या घटनेत शुभम महादेव सोनवणे (१४) हा गंभीर भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात साकेत बंधु नोकरीला होते. त्यांनी चहा बनवण्यासाठी गॅस पेटवला. पण, अगोदरच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यात हे तिघंही जण भाजले. त्यांना रुग्णांलयात उपचासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णचंद्रा हा जवळपास 70-75 तर दिपराज हा 60 ते 65 टक्के भाजल्याने दोघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाईक नरेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790