नाशिक: रो हाऊसला अचानक लागलेल्या आगीत तरुणाचा भाजल्याने मृत्यू

नाशिक: रो हाऊसला अचानक लागलेल्या आगीत तरुणाचा भाजल्याने मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): पुणे रोडवरील एका रो हाऊसला अचनाक लागलेल्या आगीत तरुणाचा जळून मृत्यू झाला.

रविवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजता हॅप्पी होम कॉलनीतील राजगुरू रो हाऊस येथे ही धक्कादायक घटना घडली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने परिसरात आग पसरली नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

जवानांनी आग विझवत असतांना तरुण पूर्णपणे जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10961,10954,10951″]

तरुणाने नैराश्यातून आग लावून घेत आत्महत्या केली की आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने पोलिसांकडून तपास सुरु आहे. मयुर उत्तम कालखैरे (३२) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस व अग्निशामक दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हॅप्पी होम कॉलनीतील राजगृह रो हाऊसमधून सायंकाळी अचानक धुराचे आणि आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजारील रहिवाशांच्या लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलास कळवले. काही वेळात दोन अग्निशमन बंब दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मयुरचा मृतदेह रुग्णवाहिकेने नेत जिल्हा रुग्णालयात दाखल केला.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; शोध सुरू:
प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरात तरुण झोपलेला होता. मात्र त्याला आग लागली हे कळले नाही. त्याचा झोपेतच जळून मृत्यू झाल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. तरुणाने आग लावून घेत स्वत:ला जाळून घेतले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

मृत तरुणाच्या पश्चात आई व वडील आहेत.अग्निशमनचे इकबाल शेख, शिवाजी फुगट, दिनेशे लासुरे, भिमाशंकर खोडे, वाहन चालक अभिजित देशमुख यांनी ही कारवाई केली. मुंबईनाका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790