नाशिक जिल्ह्यात आज (दि. ६ जून) आढळले इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यात आज (दि. ६ जून) आढळले इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही थोड्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.

रविवारच्या तुलनेत आज राज्यामध्ये किंचीतशी घट झाली आहे. मात्र कोरोनाचा धोका हा कायम आहे.

नाशिक जिल्ह्यात आज दि. ६ जून २०२२ रोजी एकूण ८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: ७ आणि मालेगाव १ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. तर आज रोजी एकूण २ रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्यमंत्री मास्कसक्तीबाबत काय म्हणाले?
दरम्यान आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. ‘मास्कसक्ती कुठेच नाहीये. मात्र मास्क वापराबाबत आवाहन करण्यात केलं आहे. तसेच आवाहनाची अंमलबजावणी व्हावी. तसेच एखाद्याने मास्क घातला नसेल, तर त्याला मास्क घाल, असं म्हटलं पाहिजे. याबाबतची चर्चाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली आहे”, असं टोपेंनी सांगितलं.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790