Shops. Office Space On Rent At Canada Corner, Nashik. Click here

गंगापूर रोड: मोठ्या बहिणीच्या दिराकडून अल्पवयीन बहिणीचे अपहरण
नाशिक (प्रतिनिधी): मोठ्या बहिणीच्या दिराने अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याचा प्रकार गंगापूररोडवरील एका कॉलेजमध्ये उघडकीस आला.
याप्रकरणी माजलगाव (बीड) येथील तरुणाविरोधात सरकारवाडा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- नाशिक: गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी
- नाशिक: लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर तीन वर्षे बलात्कार
- नाशिक: कैऱ्या तोडताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण घेते. तिला सकाळी महाविद्यालयात सोडले. सकाळी ११ वाजले तरी ती घरी न परतल्याने तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. मोठ्या मुलीच्या दिराच्या ती संपर्कात असल्याचे समजले. त्यानेच तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
![]()

