मुंबई (प्रतिनिधी): देशातील सर्वात मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीचे विलीनीकरण देशाची सर्वात मोठी खासगी कर्जदाता एचडीएफसी बँकेत होईल.
देशाच्या कॉर्पोरेट इतिहासातील हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे. यामुळे एचडीएफसीच्या प्रत्येक २५ इक्विटी शेअर्ससाठी एचडीएफसी बँकेचे ४२ इक्विटी शेअर मिळतील. विलीनीकरणानंतरही एचडीएफसी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक राहील. मात्र, तिसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआयच्या तुलनेत एचडीएफसीचे बाजार भांडवल दुपटीपेक्षा जास्त होईल. सोमवारी एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ९.१८ लाख कोटी आणि एचडीएफसीचे ४.८६ लाख कोटी रु. होते. विलीनीकरणानंतर १४.०४ लाख कोटींच्या संयुक्त बाजार भांडवलासह एचडीएफसी बँक टीसीएसला मागे टाकून देशाची दुसरी मौल्यवान कंपनी झाली आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ५.१८ लाख कोटी रु. आहे.
![]()

