
‘शेअर चॅट’ वरील मैत्री भोवली; पिडीतेवर वणी, त्र्यंबकेश्वरमध्ये बलात्कार
नाशिक (प्रतिनिधी): शेअर चॅटद्वारे झालेली मैत्री नाशिकच्या महिलेस महागात पडली आहे.
मुंबईतील संशयिताने पिडीतेला शिर्डी येथे दर्शनासाठी घेऊन जात काढलेला सेल्फी पतीला पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली.
तसेच वणी, त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना उघडकीस आली आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २८ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला.
पिडीतेच्या तक्रारीन्वये संशयिताविरुद्ध भादंवि ३७६, ३७६(२)(एन), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित मुंबईतील रहिवाशी आहे. त्याची व पिडीतेची शेअर चॅट; या सोशल माध्यमावरील ॲप द्वारे ओळख झाली. संशयिताने पिडीतेला दर्शनासाठी शिर्डी येथे नेत परीचय वाढवला. तिथे पिडीतेसोबत सेल्फी काढले. हे सेल्फी पिडीतेच्या पतीस पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली. तसेच पिडीतेला वणी, त्र्यंबकेश्वर येथे वेळोवेळी घेऊन जात जबरदस्तीने पिडीतेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक श्रीमती पी.डी. पवार तपास करत आहेत.