नाशिक: हृदयद्रावक; १३ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेत आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): काहीतरी राग मनात धरून सातवीत शिकणाऱ्या अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने थेट गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना मंगळवारी (दि. ६) सकाळी घडली. अनिकेत अर्जुन पाईकराव असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. या घटनेने सातपूर येथील प्रबुद्धनगर परिसर हळहळला.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्धनगरमधील महात्मा गांधी चौकात अर्जुन पाईकराव हे कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. ते पत्नीसह छत्रपती संभाजीनगरला गेले होते. त्यांचा लहान मुलगा अनिकेत यानेही गावाला येण्याचा त्यांच्याकडे हट्ट धरला होता, अशी परिसरात चर्चा आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

मंगळवारी घरात अनिकेत व त्याचा मोठा भाऊ हे दोघेच होते. मोठा भाऊ शाळेत गेल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याने टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. अनिकेतचा मोठा भाऊ शाळेतून घरी आल्यावर दरवाजा उघडताच अनिकेतने गळफास लावल्याचे त्याला दिसले.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

अनिकेत हा प्रबुद्धनगर येथील मनपाच्या शाळेत शिकत होता. सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास सातपूर पोलिस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790