नाशिक: डेंग्यूचे १२०० संशयित रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): महापालिका रेकॉर्डवर जरी डेंग्यूचे कमी रुग्ण असले तरी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या असल्याची चर्चा असताना आता सिडको पाठोपाठ आनंदवलीत एका डॉक्टराचाही डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे.

तर दोन्ही रुग्णांचे रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामार्फत पुण्यातील एनआयव्ही लॅबला पाठविण्यात आले असून अहवालाअंती नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता

जुलैपर्यंत नियंत्रणात असलेल्या डेंग्यूने अचानक डोके वर काढले असून यंदाच्या पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा लक्षणांशी संबंधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हीच लक्षणे डेंग्यूशी संबंधित असल्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महापालिकेच्या रेकॉर्डवर रुग्ण संख्या कमी असल्यामुळे डेंग्यू नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. तसेच मागील काही वर्षांच्या आकडेवारी दाखवून आत्ताचे काम कसे चांगले हे देखील दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची विक्रमी लागण होऊन २६१ जण पॉझिटिव्ह आढळले.

⚡ हे ही वाचा:  सिन्नरला बस थेट फलटावर घुसली; ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तिघे गंभीर... व्हिडीओ बघा…

ऑक्टोबरच्या गेल्या काही दिवसांतच डेंग्यूचे नवीन १२१ रुग्ण असून डेंग्यूचे १२७२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कर्मयोगीनगरमधील एका संशयिताचा २२ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असताना २४ तारखेला आणखी एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरचा डेंग्यू संशयित आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here