नाशिक (प्रतिनिधी): शेतकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे अनेक योजना येतात आणि जातात. त्यांचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळतो तर काहींना मिळत नाही. अशीच एक “पंतप्रधान किसान सन्मान निधी” योजना १ फेब्रुवारी २०१९ ला घोषित करण्यात आली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरून या निधीचा फायदा घेतला होता. परंतु, हा निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली खोटी माहिती भरून सरकारी अनुदान लुटल्याची माहिती समोर आली. म्हणुन नाशिक जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीसा पाठवल्या आहेत. व पैसे वसुलीचे आदेश देण्यात आले आहे. शासनाकडून मिळवलेले अनुदान परत करण्यासाठी तालुका पातळीवर मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत.
या योजनेअंर्तगत देशातील छोटे किंवा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वर्षाला ६००० रुपयांची आर्थिक मदत दोन दोन हजारांनी तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. परंतु, या योजनेमध्ये सधन शेतकऱ्यांनी देखील अर्ज भरून निधी प्राप्त करून घेतला, हे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळेच आता ११ हजार शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. यामधून ३ कोटी ५३ लाख ८४ हजार रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.