हृदयद्रावक: नाशिकला पहिल्या मजल्यावरून पडून पावणे दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू…

हृदयद्रावक: नाशिकला पहिल्या मजल्यावरून पडून पावणे दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू…

नाशिक (प्रतिनिधी): पवननगर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून पावणे दोन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. समृद्धी राहुल खैरनार (१८ महिने, रा. साईज्योत अपार्टमेंट, कृष्णा साडी सेंटरच्या मागे, पवननगर, सिडको) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. सदरची घटना गेल्या रविवारी (ता. ७) घडली. समृद्धी ही खेळत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यात दररोज ११८ टँकरच्या २५६ फेऱ्या; जिल्ह्यातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790