संतापजनक: मूकबधीर मुलाला सावत्र आईकडून मारहाण; गुप्तांगाला चटके..

नाशिक (प्रतिनिधी): आई नावाला काळिमा फासणारी घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली आहे.. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे या गावात सावत्र आईने आपल्या दहा वर्षाच्या मूक-बधिर मुलाला अत्यंत निर्दयपणे मारहाण करत या मुलाच्या गुप्तांगाला चटके देखील दिले आहेत..

या मारहाणीमुळे मुलगा गंभीर जखमी झाला आहे.. सध्या या मुलावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. अगदी किरकोळ कारणामुळे या सावत्र आईने अशाप्रकारे बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे… त्याच्या आईने मात्र हे आरोप फेटाळून लावत मुलांनेच स्वतःला जाळून घेतलं असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790