नाशिक (प्रतिनिधी) : गंगापूररोड येथील वृद्ध महिलेला बँक अधिकारी असल्याचे सांगून, सायबर चोरट्याने वृद्धेच्या बँक खात्याची माहिती मिळवली. तर एफडीची रक्कम व बचत खात्यातील रक्कम असे २ लाख रुपये ऑनलाईन लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार, हेमलता सतीश गोगटे (रा. गंगापूररोड) यांना १० नोव्हेंबर रोजी ९८८३०४५६५८ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने बँक ऑफ बडोदा बँकेचे व्यवस्थापक ओम प्रकाश असल्याचे भासवून, बचत खात्याला तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले. दरम्यान, बँकेच्या एम कनेक्ट ऍपचा पासवर्ड मागितला. त्याद्वारे बचत खात्यातील व खात्यास संलग्न असलेल्या ३ एफडीमधील २ लाख ५ हजार ४९९ रुपये काढून घेतले. गोगटे यांनी बँकेत तपास केला असता त्यांना फसवणूक झाल्याचे समजले.