आर्थिक अडचणींना कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या, दोघं मुलेही अत्यवस्थ

नाशिक (प्रतिनिधी): आपल्या दोन मुलांना रक्तदबावरील औषध देऊन आणि स्वत:ही प्राशन करत विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. १२) सकाळी ७ वाजता उषाकिरण सोसायटीतील एका बंगल्यात उघडकीस आला. यात महिलेचा मृत्यू झाला असून मुलगा व मुलगी अत्यवस्थ आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सोनल यांच्या सापडलेल्या चिठ्ठीत लग्न झाल्यापासून संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उषाकिरण सोसायटीत राहणारे सुहास प्रमोदकुमार शाह हे पत्नी सोनल (४३) आणि मुलगा तनुष (१७) व मुलगी रिया (१२) यांच्यासोबत राहतात. शहा यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. सकाळी शहा हे नेहमीप्रमाणे दूध विक्रीसाठी बाहेर गेले होते. पत्नी व मुले झोपलेले होते. दूध विक्री करून आल्यानंतर त्यांनी पत्नीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या उठल्या नाही. मुलांनाही उठवण्याचा प्रयत्न केला पण तेही प्रतिसाद देत नसल्याने तत्काळ गंगापूर पोलिसांना त्यांनी ही बाब कळवली. असता वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल हे घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वी सोनल यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तनुष व रिया यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांना सोनल यांच्याजवळ चिठ्ठी आढळून आली आहे. यात लग्न झाल्यापासून संघर्ष करत आहे, आर्थिक चणचण आहे असा मजकूर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंगापूर पोलिस ठाण्यात महिलेच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक मुदगल करत आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

सोनल शहा यांनी आत्महत्या करण्यासाठी रक्तदाबावरील औषधाची अधिक मात्रा स्वत: घेतली. तसेच मुलगा व मुलीलाही दुधात अधिक प्रमाणात गोळ्या दिल्या असाव्या असा पोलिसांचा अंदाज असून घटनास्थळाहून औषधांचे पाकीट पोलिसांनी ताब्यात केले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790