जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख २२ हजार १६७ रुग्ण कोरोनामुक्त; ६ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ६ हजार ३७९  रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १६६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४१, चांदवड २८, सिन्नर ९२, दिंडोरी ४२, निफाड १८१, देवळा २३ नांदगांव १३५, येवला ७७, त्र्यंबकेश्वर ४२, सुरगाणा ०७, पेठ ०१, कळवण २१,  बागलाण ५०, इगतपुरी २५, मालेगांव ग्रामीण ३९  असे एकूण ९०४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ९२४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४८९ तर जिल्ह्याबाहेरील ६२ असे एकूण ६  हजार ३७९  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ३० हजार ७१२ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९५. ३१ टक्के, नाशिक शहरात ९३.०२ टक्के, मालेगाव मध्ये  ८८.३२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.४६ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ८६५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ६१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८० व जिल्हा बाहेरील ६० अशा एकूण २ हजार १६६  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दि. १३ मार्च सकाळी ११ वाजता प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790