नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा !
नाशिक (प्रतिनिधी): नागपूर येथील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
गौरव भाऊराव राहुले (रा. लष्करी बाग भोसलेवाडी,नागपूर) असे संशयिताचे नाव आहे.
या तरुणाने वैदिक पध्दतीने लग्न करण्याचे नाटक करून पीडितेस फसविले आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आणि पीडिता यांच्यात प्रेमसंबध होते. २८ डिसेंबर २०१९ ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान संशयिताने पीडितेस विवाहाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला.
- बारा जणांचा बळी घेणारा ‘ब्लॅक स्पॉट’ झाला ट्रॅफिक फ्रेंडली, गतिरोधक, रंबल स्ट्रीपसह पॅचअप वर्क
- Nashik Breaking: राज्यभर गाजलेल्या रोलेट खटल्यातून कैलास शहांची निर्दोष मुक्तता
- नाशिकला या ठिकाणी मिळतोय अस्सल कोकण मेवा.. नक्की ट्राय करा !
तरूणीच्या रूमवर आणि नाशिक येथील घरी संशयिताने हे कृत्य केले. या काळात युवती गर्भवती राहिल्याने संशयिताने तिच्याशी वैदिक पध्दतीच्या विवाहाचा बनाव करीत ग’र्भ’पा’त करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच पीडितेने संशयितास जाब विचारला असता त्याने बदनामी करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह, अनैसर्गिक कृत्य आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.