जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या भू- माफिया या शॉर्टफिल्म रिलीजचा कार्यक्रम मंगळवारी डॉ. सुरेश वाडकर व सौ पद्मा वाडकर यांच्या हस्ते पार पडला.. पोलिस आयुक्त दीपक पांडे आणि सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी या शॉर्ट फिल्मचे बटण दाबून सुरू करत उदघाटन केले.
शहरात काही दिवसांपूर्वी भूमाफियांनी गंगापूररोड परिसरात रमेश मंडलिक यांच्या मालकी हक्काची जमीन बळकवण्यासाठी मंडलिक यांचा नि’र्घृ’णपणे खू’न केला होता,या प्रकरणातील भूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार गंगापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील मुख्य सूत्रधार आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाई करण्यात आली होती. राज्यातील ही मोक्का अंतर्गत केलेली पहिलीच कार्यवाई ठरली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने हे प्रकरण हाताळत यातील अनेक बडे भूमाफिया यांच्या देखील मुसक्या आवळत शहर भूमाफियामुक्त करण्याच्या दिशेने पाऊले उचलली. आणि रमेश मंडलिक यांच्या खु’नाच्या केस मध्ये मंडलिक यांच्या परिवारातील सदस्यांना खात्री पटवून देत या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयन्त नाशिक पोलिसांनी केला. ही केस कशाप्रकरे हाताळत पोलिसांनी भुमाफियांच्या मुसक्या आवळल्या हे या शॉर्ट फिल्म मधून दाखवण्यात आले आहे. अशा समस्यांनी त्रासलेल्या नागरिकांना पुढे येऊन पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलंय.
सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची देखील एका जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक झाली होती या प्रकरणामूळे वाडकर हे देखील खूप त्रस्त झाले होते. गेली 11 वर्ष ते या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात त्रस्त झाले होते. याबाबतची कैफियत यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली. त्यांच्या सोबत झालेल्या जमीन घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन प्रकरणं हाताळत न्याय मिळून देणारा असल्याचे आश्वासन आयुक्त पांडे यांनी दिले. पांडेंच्या कामावर खुश झालेल्या वाडकर यांनी आपले गाजलेलं गीत गात पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचे आभार मानले..
दुसरीकडे आता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अश्या भूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पाऊले उचलली असून अश्या जमीन घोटाळ्यात फसवणूक झालेल्या किंवा त्रस्त असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या काळात आपला घाम गाळून आणि कष्टाने कमावलेल्या नागरिकांच्या जमिनीवर काना डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात पोलीस आयुक्तांनी पुकारलेल्या या मोहिमेमुळे भूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
ही शॉर्ट फिल्म बघण्यासाठी इथे क्लिक करा..