नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार २२९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत १ हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ०८ ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २४,  बागलाण ११, चांदवड २७, देवळा ०९, दिंडोरी २९, इगतपुरी २७, कळवण ०५, मालेगाव ४०, नांदगाव १९, निफाड ८६, पेठ ०१, सिन्नर ७६, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०३, येवला ५२ असे एकूण ४१० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६ तर जिल्ह्याबाहेरील ०३  रुग्ण असून असे एकूण १ हजार ७२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ८२४ रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९७.०५  टक्के, नाशिक शहरात ९८.०१ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६८  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६२  इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार ९२  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९४८  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या ठिकाणी मिळतेय किराणा मालावर घसघशीत सूट !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790