नाशिक (प्रतिनिधी): बेड न मिळाल्याने नाशिक महापालिका मुख्यालयाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे शहरात बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे.. अशातच ही घटना घडल्याने नाशिकमधील आरोग्य व्यवस्था प्रशासनाच्या हाताबाहेर गेलीये की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय.
काल संध्याकाळी महापालिकेच्या आवारात बेड मिळत नाही म्हणून एक कोरोना रुग्णाने आपले नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ता दीपक डोके यांच्या सोबत आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर मनपा अधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णाला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.दरम्यान स्टं टबाजी केल्याने या रुग्णाचा मृत्यू आल्याचा आरोप खुद्द महापालिका आयुक्तांनी केला आहे, रुग्णाला उपचाराची गरज असताना अश्याप्रकारे स्टं ट बाजी करून आंदोलन करायची काय गरज होती असा सवाल देखील आयुक्तांनी केला आहे…..
एकीकडे स्टं ट बाजी केल्याने रुगणाचा मृत्यू झाला असला तरी, उपचारा अभावीच ह्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे..गेल्या दोन दिवसंपासून बेड मिळत नसल्याने आम्हाला महापालिकेत येऊन आंदोलन करावं लागलं अशी माहिती मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ता दीपक डोके याच्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
हा घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक असून या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे..