नाशिक (प्रतिनिधी): सध्या वाहन तसेच इतर वस्तू विक्रीसाठी अनेक लोकं फेसबुकवर पोस्ट टाकतात, आणि आपण त्यांच्यासोबत व्यवहार करतो. मात्र असे व्यवहार करताना समोरची व्यक्ती किती विश्वासाची आहे हे तपासणेही तितकेच गरजेचे आहे. असाच एक प्रकार नाशिकच्या एका व्यक्तीसोबत घडला आहे. आणि त्याची तब्बल २ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
फेसबुकवर गेल्या काही दिवसांपूर्वी इन्होवा गाडी विक्रीची जाहिरात होती. ती जाहिरात बघून हनुमान नगर (पंचवटी) येथे राहणाऱ्या ओमप्रकाश बिश्नोई यांनी सदर व्यक्तीशी संपर्क साधला आणि गाडी विकत घेण्यात स्वारस्य दाखवले. जाहिरात टाकणाऱ्या व्यक्तीने बिश्नोई यांना वेळोवेळी एकूण २ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. आणि त्यानंतर तो गायब झाला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे बिश्नोई यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.