पोलिसांवर दगडफेक प्रकरणी संशयित आरोपांची धिंड !

नाशिक (प्रतिनिधी): चारणवाडी येथे झालेल्या दगडफेकीत दोघे पोलीस गंभीर  जखमी झाल्याची घटना समोर आली होती, याबाबत कडक कार्यवाई करत 7 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची परिसरातून धिंड काढण्यात आली असून उर्वरित काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. देवळाली कॅम्प येथे शिवजयंतीच्या रात्री चारणवाडी येथील त्रिमूर्ती चौक परिसरात झालेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  ३० जूनपर्यंतच संधी! HSRP नंबर प्लेट अनिवार्य; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

दगडफेकीत दोघा पोलिसांना मार लागल्याने हे दोघे पोलीस सदर घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ह्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार याबाबत पोलिसांनी कारवाई करून सात संशयितांना ताब्यात घेतले आहे, ह्या सातही संशयित समाजकंटकांची पोलीस बंदोबस्तात परिसरातून धिंड काढण्यात आली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे..

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'हरित नाशिक' लोकचळवळ व्हावी; मिशन ग्रीन मॉन्सूनअंतर्गत एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचे काम पोलिसांचे असून त्याला गालबोट लावण्याचे काम जो कोणी करत असेल तर अशा  गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यात येईल यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा देखील यावेळी पोलिसांकडून देण्यात आला आहे..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790