Live Updates: Operation Sindoor

नाशिक शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार

नाशिक शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार

नाशिक (प्रतिनिधी): शहर परिसरात काल वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जण ठार झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.

अपघाताचा पहिला प्रकार सातपूर येथे घडला. फिर्यादी पुष्पा गोपाळ बहिरम (वय 45, रा. शांतीदीप अपार्टमेंट, सातपूर कॉलनी, नाशिक) यांचा भाचा शुभम् यशवंत बच्छाव (वय 19, रा. सातपूर) हा कंपनीतील काम आटोपून घरी पायी जात होता. तो सिएट कंपनीसमोर आला असता भरधाव आलेल्या एमएच 15 जेसी 0587 या क्रमांकाच्या टेम्पोवरील चालक रोहिदास रामदास वाघ (वय 24, रा. श्रमिकनगर) याने त्याला धडक दिली. त्यात शुभम् बच्छाव याचा मृत्यू झाला.

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वाहनचालक रोहिदास वाघ विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.

अपघाताचा दुसरा प्रकार कॅनॉल रोड येथे घडला. फिर्यादी राजेश ऑगस्टीन स्वामी (वय 21, रा. जेलरोड, नाशिकरोड) व त्यांचे मित्र रोशन व आकाश सुभाष जावळेकर (वय 25) हे मोटारसायकलीने आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोडने जेवणासाठी जात होते. त्यादरम्यान, कॉन्ट्रॅक्टर मे. पी. एल. आडके या कंपनीने रस्त्याचे खोदकाम करताना त्याची काळजी घेतली नाही म्हणून रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याने आकाश जावळेकर याचा मृत्यू झाला, तर रोशन अहिरे हा जखमी झाला असून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक घोटेकर करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अपघाताचा तिसरा प्रकार चांदगिरी कॅनॉलजवळ घडला. शेखर राजू पगारे (वय 27, रा. कोटमगाव, ता. जि. नाशिक) हे मोटारसायकलीने जात होते. त्यावेळी चांदगिरी कॅनॉल, नाशिकरोडजवळ आले असता त्यांना अज्ञात मोटारसायकल-स्वाराने धडक दिली. त्यात पगारे हे जखमी झाले. त्यांना त्यांचे भाऊ अंबादास पगारे यांनी औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक परिमंडळात सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या

अपघाताचा चौथा प्रकार जुने नाशिक येथे घडला. हृषिकेश विजय दमक (वय 25, रा. के. के. वाघ कॉलेजच्या पाठीमागे, नाशिक) हा 15 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास मोटारसायकलीने जात होता. त्यावेळी झाकीर हुसेन हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर दमक हा पाठीमागून जाऊन आदळला. त्यात त्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मित्र मयूर पाटील यांनी औषधोपचारासाठी मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790