नाशिक: वीज कट करण्याचा एसएमएस पाठवून ९० हजार रुपयांचा गंडा

नाशिक: वीज कट करण्याचा एसएमएस पाठवून ९० हजार रुपयांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): सायबर हॅकर्सनी पैसे उकळण्याचा एक नवीन फंडा वापरण्यास सुरवात केली आहे.

सध्या वीज बिल न भरल्याने कनेक्शन बंद करण्याचा संदेश पाठवून ग्राहकांना ऑनलाइन गंडा घातला जातोय.

नाशिक नाशिक शहरात हे प्रकार सर्रास सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसात दोन प्रकार घडले आहेत.

पंधरा दिवसापूर्वी शहरातील रामदास अमृतकर यांना चार लाखांचा गंडा घालण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

तर आता रविकांत काळे यांनासुद्धा क्रेडिट कार्ड ची माहिती घेऊन 90 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविकांत कमलाकर काळे (वय 46) हे मुंबई येथे राहतात. काळे नाशिकला आले होते. 22 मे रोजी काळे त्र्यंबकेश्वर येथून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. बसने प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान द्वारका चौक येथे त्यांच्या मोबाईलवर बेस्ट इलेक्ट्रिसिटी या शीर्षकाचा मेसेज आला. तुमचे विजेचे बिल भरलेले नसल्याने  कनेक्शन कट करण्यात येणार आहे तरी तात्काळ 6295841228 या मोबाईल क्रमांकावर फोन करा, असा मेसेज आला होता.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

त्यानुसार काळे यांनी संबधित क्रमांकावर संपर्क साधला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव दीपक शर्मा सांगितले. काळे यांना त्यांच्या मोबाईलवर टीम विवर हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार काळे यांनी ॲप डाऊनलोड केले. ॲप ॲक्टिव्हेट करण्यासाठी दहा रुपयांची बिल पेमेंट करण्यास सांगण्यात आले. काळे यांनी स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करीत विचारलेली सर्व माहिती भरून हे बिल अदा केले. परंतु त्यानंतर त्या कार्डवरून 90 हजार 338 रुपये खात्यातून काढण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

फसवणूक झाल्याचे काळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई नाका पोलिसांनी संशयितांवर फसवणुकीचा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

सायबर हॅकर्स ने आता otp न घेता आपल्या  एका विशिष्ट अँपच्या मदतीने आपल्या मोबाईलचा ताबा घेत आहे. आता गरज आहे ती नागरिकांनी सतर्क राहण्याची.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790